(मुंबई)
उच्च शिक्षणाचा विस्तार करण्याच्या मोहिमेत, लवकरच देशभरातील एकल बी.एड महाविद्यालये बहुविद्याशाखीय संस्थांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत, बी.एड सोबतच, बीए, बी.एसस्सी आणि बी.कॉमसारखे अभ्यासक्रम देखील या संस्थांमध्ये चालवले जातील.
या एकल बी.एड महाविद्यालयांचे संचालन करणारी संस्था, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई) ने या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, या समितीच्या माध्यमातून या सर्व संस्थांना बहुविद्याशाखीय संस्था म्हणून श्रेणीसुधारित करण्यासाठी कालमर्यादा देखील तयार करेल. एनईपीच्या शिफारशी लागू करण्यासाठी एनसीटीईने नुकत्याच झालेल्या बोर्ड बैठकीत हा निर्णय घेतला आहे. लवकरच, या सर्व संस्थांच्या संसाधनांचा आणि क्षमतांचा अभ्यास करून, एनसीटीई त्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करणार आहे. सध्या देशभरात ३७ हजारांहून अधिक बी.एड महाविद्यालये आहेत, ज्यात सुमारे १२ हजार एकल बी.एड महाविद्यालये आहेत.
नवीन एकात्मिक बी.एड. नियमा अंतर्गत. संस्थांना बीए, बीएससी आणि बीकॉम सारखे अभ्यासक्रम चालवणे बंधनकारक आहे. आता, पाच वर्षांच्या एकात्मिक बी.एड अभ्यासक्रमात बीए-बी.एड, बी.एससी-बी.एड आणि बी.कॉम-बी.एड सारखे अभ्यासक्रम चालवले जातील. त्याचाप्रमाणे सध्या फक्त काही निवडक उच्च शिक्षण संस्थांनाच हे एकात्मिक बी.एड. चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की NEP अंतर्गत, २०३५ पर्यंत देशातील उच्च शिक्षणाचा एकूण नोंदणी प्रमाण (GER) ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याद्वारे देशातील उच्च शिक्षण संस्थांची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. सध्या, देशातील उच्च शिक्षणाचा GER सुमारे २९ टक्के आहे.