(नवी दिल्ली)
काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे माजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’विरोधात नवीन जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यासाठी त्यांनी ‘http://votechori.in/ecdemand’ ही वेबसाइट सुरू केली असून, निवडणुकांमधील कथित अनियमिततेविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, “मत चोरी हा ‘एक व्यक्ती, एक मत’ या मूलभूत लोकशाही तत्त्वावर थेट आक्रमण आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी स्वच्छ आणि पारदर्शक मतदार यादी आवश्यक आहे. त्यामुळे आमची मागणी स्पष्ट आहे – निवडणूक आयोगाने पारदर्शकता दाखवावी आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करावी, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः याचे ऑडिट करू शकतील.”
ते पुढे म्हणाले, “ही केवळ एक मोहीम नाही, तर आपल्या लोकशाहीच्या रक्षणासाठीचा संघर्ष आहे.” त्यांनी जनतेला या मोहिमेत सामील होण्यासाठी आवाहन करत म्हटले की, “http://votechori.in/ecdemand या लिंकला भेट द्या किंवा 9650003420 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.” राहुल गांधींच्या या मोहिमेला काही नागरिकांचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत समर्थनही नोंदवले आहे.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत, निवडणूक आयोगाने केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “जर राहुल गांधी यांना त्यांची विश्वासार्हता जपायची असेल, तर त्यांनी मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम २०(३)(ब) अंतर्गत शपथपत्रासह अपात्र मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचे स्पष्टपणे नमूद करावे.”
नरेंद्र मोदी २५ जागांच्या फरकाने तिस-यांदा पंतप्रधान झाले. भाजपने ३५ हजार किंवा त्यापेक्षा कमी मतांनी जिंकलेल्या २५ जागा अशा आहेत, जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की मोदी चोरी करून पंतप्रधान झाले आहेत, अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाने गेल्या १० वर्षांची संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मतदार यादी आणि व्हिडिओग्राफी द्यावी. जर हे सर्व दिले नाही तर तो गुन्हा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. आम्ही भाजपला निवडणूक चोरण्याची परवानगी देत आहोत. संपूर्ण देशाने निवडणूक आयोगाकडे मतदारांचा डेटा मागितला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधी यांनी नुकत्याच दिल्लीतील एका परिषदेत असा दावा केला होता की, शकुन राणी नावाच्या महिला मतदाराने दोन वेळा मतदान केले. त्यांनी या संदर्भात काही दस्तऐवज दाखवले होते. मात्र, चौकशीत शकुन राणी यांनी हा आरोप फेटाळून लावत ‘मी केवळ एकदाच मतदान केले’ असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाच्या नोटीसमध्ये नेमकं काय?
– प्राथमिक चौकशीत राहुल गांधींनी दाखवलेला टिक-मार्क असलेला दस्तऐवज अधिकृत मतदान अधिकाऱ्यांनी दिलेला नाही असे आढळले.
– राहुल गांधींना संबंधित सर्व मूळ कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
– या पुराव्यांच्या आधारे आयोग प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.
भारतीय निवडणूक प्रक्रियेत दुहेरी मतदान हा गंभीर गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास IPC अंतर्गत कारवाई आणि मतदार यादीतून नाव वगळणे अशी कारवाई केली जाते.
राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर आरोप काय?
राहुल गांधींनी केलेल्या व्होट चोरी (Vote Theft) आरोपांनुसार, कर्नाटकातील बंगळुरूमधील महादेवपूर विधानसभा मतदार विभागात 1,00,250 पेक्षा अधिक मत चोरी झाल्याचा दावा केला. या आरोपांचा आधार ठेवण्यासाठी त्यांनी सहा प्रमुख मुद्द्यांची मांडणी केली.
ड्युप्लिकेट मतदार (Duplicate Voters)
– 11,965 लोक एकाच नावे दोनदा मतदान यादीत नोंदले गेले.
फेक किंवा अवैध पत्ते (Fake Invalid Addresses)
– 40,009 मतदारांकडे वास्तविक नसलेले किंवा अचूक नसलेले पत्ते दाखल केले गेले.
एकाच पत्त्यावर एकदम मोठा संख्या (Bulk Registrations at Single Address)
– 10,452 मतदार एका पत्त्यावर एकत्र नोंदले गेले; उदाहरणार्थ एक लहान खोलीत 80 लोकांची नावे.
अवैध फोटो (Invalid Photos)
– 4,132 मतदारांच्या यादीत फोटो चुकीचे आकाराचे होते किंवा नसताच होते.
फॉर्म 6 चा गैरवापर (Misuse of Form 6)
– 3,369 मतदारांनी Form-6 (नवीन मतदार म्हणून नोंदणीसाठी वापरलेला फॉर्म) अनेकदा गैरकायद्याने वापरला.
शकुन राणी प्रकरण (Case of Shakun Rani / Double Voting Allegation)
– एक 70 वर्षांच्या महिला मतदार शकुन राणी केवळ एकदाच मतदान केलेली असली तरी, त्यांचे नाव दोनदा यादीत आले असल्याचा दावा. राहुल गांधी यांनी अशी उदाहरणे कोर्टात आणि कमिशनसमोर मांडली.

