( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्हा फोटो व व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्था मर्यादित रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरीमध्ये प्रथमच भव्य फोटोग्राफी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ८ ऑगस्ट २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, माळनाका, रत्नागिरी येथे हे वर्कशॉप आयोजित करण्यात आले असून, सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत हे सत्र पार पडणार आहे. या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे भारतातील नामांकित फोटोग्राफर आणि नॅशनल अवॉर्ड विजेते देवदत्त कशाळीकर (पुणे) यांचे मार्गदर्शन मिळणार असून, त्यांच्या जोडीला डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट संदीप भागवत (पुणे) हेही उपस्थित राहून व्यवसायवाढीच्या नव्या शक्यतांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
फोटोग्राफी व्यवसायात अलीकडे अनेक अडचणी निर्माण होत असून, त्या अडचणींमागची कारणे, उपाययोजना, व्यवसाय वृद्धीचे मार्ग आणि डिजिटल मार्केटिंगचे तंत्र या सर्व विषयांवर व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी फक्त ₹२०० इतकी नोंदणी फी निश्चित करण्यात आली असून, यामध्ये जेवणाचा समावेश आहे. वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी सीट्स मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणीसाठी इच्छुकांनी अनिकेत जाधव (मो. 7397988844) यांच्याकडे ऑनलाईन पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवावा, त्यानंतर https://chat.whatsapp.com/ESBcdXNX5IhImglnE2oOez?mode=ac_t या लिंकवर क्लिक करून अधिकृत वर्कशॉप व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.
वर्कशॉपदरम्यान किशन फोटो प्लाझा (कोल्हापूर) आणि SRK लॅब (मुंबई) यांच्याकडून विशेष फोटोग्राफी मटेरियलचे लाईव्ह डेमोही आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा केवळ शिकवण देणारी नसून, प्रत्यक्ष अनुभव देणारी ठरणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी विनय बुटाला ७५८८९१८३५२, दिनेश शिंदे ९९७५१७०९५२ आणि सुनील शेट्ये ९५१८३७११९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.