(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुका मंडप लाईट साऊंड असोसिएशन तर्फे येत्या ३१ जुलै रोजी टर्फ क्रिकेट स्पर्धा व रक्तदान शिबीर याचे आयोजन शिवरुद्र स्पोर्ट्स, कृषी उत्पन्न बाजार समिती, शांतीनगर नाचणे येथे करण्यात आले आहे. रत्नागिरी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री. अमरेशजी सावंत यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता या कार्यक्रमांचे उदघाटन होणार आहे. सदर टर्फ क्रिकेट स्पर्धा असोसिएशन चे सभासद असणाऱ्या मंडप लाईट साऊंड व्यावसायिकांकरिता मर्यादित आहे.
सर्व व्यावसायिक मित्रांनी एकत्र यावे याकरिता मेळावे, सभा अशा कार्यक्रमांचे आयोजन होत असते मात्र व्यावसायिकातील क्रीडा गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रामुख्याने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका कार्यकारणी खूप मेहनत घेत आहे. तरी तालुक्यातील सर्व व्यावसायिक मित्रांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आणि आपल्यातील क्रीडा गुणांना वाव देता देता रक्तदानासारख्या खूप महत्त्वाच्या अशा उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुकाध्यक्ष श्री. मिलिंद गुरव व इतर कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले आहे.