(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील व कोकणातील प्रसिद्ध फोटोग्राफर गुरु चौगुले यांना कला, फोटोग्राफी, फोटोग्राफी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य याबद्दल गोवा म्हापसा येथील एका कला साहित्य क्षेत्रातील कार्यक्रमामध्ये दिनांक 11 जानेवारी रोजी “आऊटस्टँडिंग परफाॅरमर अवॉर्ड पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम प्रणव प्रकाशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र आणि गोव्यामधील साहित्य आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांना उल्लेखनीय कामाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी मधील गुरु चौगुले यांचे संपूर्ण कोकण आणि गोव्यात देखील फोटोग्राफी क्षेत्रामध्ये अतिशय चांगले नाव आहे. गुरु चौगुले यांना याआधीही गोव्यामध्ये बेस्ट फोटोग्राफी अवॉर्ड मिळालेले आहेत. त्याशिवाय राज्यस्तरीय आदर्श छायाचित्रकार पुरस्कार, राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार, तसेच नुकताच त्यांना “कोकणरत्न पुरस्कार”ही मिळालेला आहे. रत्नागिरी आणि गोव्यातही त्यांचे फॅशन फोटोग्राफी,तसेच कास्टींग प्रोडक्शन मध्ये विशेष नाव आहे.
कला,फोटोग्राफी ,फोटोग्राफी क्षेत्र तसेच पत्रकारिता विविध संस्थांवर करीत असलेले उल्लेखनीय कार्य ,महिला सक्षमीकरण,रोजगार उपलब्धता या सर्वांचा विचार करून गोव्यामध्येही त्यांचा “आऊटस्टॅन्डींग परफाॅरमन्स इन आर्ट” हा पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी गोव्यातील अनेक छायाचित्रकार पत्रकार बंधू तसेच नाट्य सिने कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व हितचिंतक, फोटोग्राफर बंधू आणि फोटोग्राफी असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक, गुरुबंधू राजू चौगुले, आयोजक यांचे आभार व्यक्त केले.

