(चिपळूण)
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उमरोली गावात जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतीत कृषी अभ्यास, सेवा कार्य व अनुभव आत्मसात केला.
या उपक्रमाचा मुख्य हेतू ग्रामीण व शेती जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देणे आणि शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतींचे ज्ञान व सहाय्य पुरवणे हा आहे. याचाच एक भाग म्हणून उमरोली येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम बहुतले यांच्या शेतात माती परीक्षण (Soil Testing) करण्यात आले.
या परीक्षणाद्वारे मातीतील pH, सेंद्रिय कर्ब, नायट्रोजन, स्फुरद, पालाश तसेच अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासण्यात आले. या विश्लेषणावर आधारित खत व्यवस्थापन, पिकांची निवड, व मातीचे पोषण संतुलन राखण्याचे उपाय याविषयी शिफारसी देण्यात आल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या सुपीकतेनुसार पुढील शेती नियोजनासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
माती परीक्षणावर आधारित काही महत्त्वाच्या शिफारसी खालीलप्रमाणे देण्यात आल्या:
- जमिनीतील सेंद्रिय घटक वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर
- pH संतुलनासाठी आवश्यक प्रक्रिया
- पीक उत्पादन वाढवण्यासाठी अन्नद्रव्यांची पूर्तता
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतीविषयक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळाले, तर शेतकऱ्यांनाही आधुनिक कृषी विज्ञानाच्या आधारे वैज्ञानिक मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले व विषय शिक्षक श्री. गावनांग M.R. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात उमरोली गावातील कृषीदूत विद्यार्थी आदित्य पाटील, सार्थक चंदोबा, प्रणव पाटील, प्रथमेश संनबे, अन्वय धोंडे, गणेश जगताप, सम्मेद कुंभोजे, प्रथमेश पाटील, क्षितिज कुलकर्णी, राजवर्धन पाटील, रोहन चव्हाण आदींनी सहभाग घेतला.