(पुणे)
पुणेकरांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. कोकणात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पुणे ते रत्नागिरी मार्गावर रेल्वे प्रशासनाने विशेष साप्ताहिक गाड्यांची घोषणा केली आहे. यामुळे हजारो कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे–रत्नागिरी दरम्यान एकूण १२ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये सामान्य व वातानुकूलित (AC) अशा दोन प्रकारांतील गाड्यांचा समावेश आहे.
गाडी क्रमांक 01447 / 01448 – सामान्य साप्ताहिक विशेष गाडी
-
गाडी क्रमांक 01447 :
-
23, 30 ऑगस्ट व 6 सप्टेंबर 2025 रोजी
-
पुणे स्थानकावरून रात्री 12.25 वा. सुटका
-
रत्नागिरीत सकाळी 11.00 वा. आगमन
-
-
परतीची गाडी (01448) :
-
23, 30 ऑगस्ट व 6 सप्टेंबर 2025 रोजी
-
रत्नागिरीहून दुपारी 5.50 वा. सुटका
-
पुण्यात पहाटे 5.00 वा. आगमन
-
गाडी क्रमांक 01445 / 01446 – वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी
-
गाडी क्रमांक 01445 :
-
26 ऑगस्ट, 2 व 9 सप्टेंबर 2025 रोजी
-
पुणे स्थानकावरून रात्री 12.25 वा. सुटका
-
रत्नागिरीत सकाळी 11.50 वा. आगमन
-
-
परतीची गाडी (01446) :
-
26 ऑगस्ट, 2 व 9 सप्टेंबर 2025 रोजी
-
रत्नागिरीहून दुपारी 5.50 वा. सुटका
-
पुण्यात पहाटे 5.00 वा. आगमन
-
या विशेष गाड्या चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी आरक्षण वेळेत करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.