(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या आनंदात, शिस्तबद्ध उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मेर्वी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, शिक्षिका ऐश्वर्या गुरव, डाॅ.गौरी प्रसाद दामले, आशाताई सौ.ईश्वरी खरडे आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली होती.
प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचा हेतू उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी आंतरराष्ट्रीय योग दिना विषयी माहिती आणि योगाचे जीवनातील महत्त्व विशद केले .आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर यांनी केले.सकाळ सत्रात मुख्याध्यापिका सौ. शर्वरी करगुटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त अतिशय उत्साहात सूर्य नमस्कार, भुजंगासन, मकरासन , हलासन , पद्मासन, नौकासन, धनुरासन, शवासन, सिद्धासन , पश्चिमोतसन, सुप्त वज्रासन, मयुरासन, त्रिकोणासन ,वक्रासन , बद्ध पद्मासन, आदि योग प्रकार सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके, कृतीतून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शर्वरी करगुटकर ,उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर, शिक्षिका ऐश्वर्या गुरव आदिंनी बहुमोल मार्गदर्शन केले आहेत.
दुसर्या सत्रात डाॅ. गौरी प्रसाद दामले यांनी विद्यार्थ्यांना योग प्रकाराबद्दल माहिती सांगितली व काही योग प्रकार कृतीसह दाखविले. शेवटी उपशिक्षक श्री.चंद्रशेखर पेटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
फोटो : जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग करताना विदयार्थी व मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर , संजया पावसकर, ऐश्वर्या गुरव सर्व शिक्षकवृंद
(छाया : दिनेश पेटकर, गावखडी)