(मंडणगड)
दारूच्या नशेत तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दहागाव (ता. मंडणगड) येथील दळवीवाडी परिसरात घडली. श्रीरंग हैबर जगताप (रा. दहागाव, दळवीवाडी) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरंग जगताप यांना दारूचे व्यसन होते. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडलेल्या जगताप यांचा शोध लागत नव्हता. अखेर १३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता गावातील अनिल जनार्दन जगताप यांच्या घरामागील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. विहिरीच्या कडेला बसले असताना तोल जाऊन ते पाण्यात पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची नोंद आमू. क्र. १०/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १९४ नुसार करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास मंडणगड पोलिस करत आहेत.