(रत्नागिरी)
शहरातील टीआरपी परिसरात राहत्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभी करून ठेवलेली होंडा शाईन दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रशांत प्रभाकर रसाळ (वय ३१, व्यवसाय – बँक एजंट, रा. रूम नंबर १०१, शिवरेकर हाइट्स, टीआरपी, रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२५ रोजी दुपारी २.१५ वाजता ते १० जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान, त्यांनी वापरात असलेली काळ्या रंगाची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एमएच-४८/क्यू/८०६३) ही आपल्या राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी करून ठेवली होती.
या दरम्यान अज्ञात इसमाने सदर दुचाकीवर लक्ष ठेवून, ती चोरी करण्याचा लबाडीचा इरादा करत, फिर्यादी यांची कोणतीही संमती न घेता ती चोरून नेली. चोरीस गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत ३०,००० रुपये इतकी आहे. या प्रकरणी गु.र.नं. 303/2025 नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चोरट्याचा शोध सुरू आहे.