(जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील ओरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत घेण्यात आलेल्या लक्षवेधी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये केंद्र शाळा ओरी नं.१ शाळेतील कु. स्पृहा संकेत देसाई हिने बीट स्तरीय स्पर्धेत लहान गटातून आपल्या कौशल्याच्या बळावर प्रथम क्रमांक पटकावून तिची आता रत्नागिरी तालुका स्तरावर निवड करण्यात आली आहे.
तालुका स्तरीय स्पर्धा मंगळवार दि. २३ डिसेंबरपासून रत्नागिरी येथे होणार आहे. कु.स्पृहा देसाई हिला अभ्यासाबरोबरच बुद्धीबळ खेळाची, नृत्याची आवड आहे. कु.स्पृहा संकेत देसाई हिच्या यशाबद्दल तिचे ओरी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ. समिक्षा पवार, सहाय्यक शिक्षक गणपती पडूळे, रामदास चव्हाण, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष वसंत जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संकेत उर्फ बंड्या देसाई यांनी खास कौतुक करून तालुका स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

