(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही आषाढी पौर्णिमा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेला प्रारंभ करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक मुंबई बौद्धजन पंचायत समितीचे अतिरिक्त सरचिटणीस श्रीधर साळवी व मुंबई समितीच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष व कवी मुकुंद महाडिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी विचार मंचावर उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, सहसेक्रेटरी शशिकांत कांबळे, संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, तृप्ती कांबळे,करुणा पवार, रितिका जाधव, दिया कांबळे,सान्वी कांबळे, प्रज्ञा पवार, समितीचे जेष्ठ मार्गदर्शक विजय जाधव, मिलिंद कांबळे, सुनील कांबळे, सुनील आंबुलकर, जयवंत कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सेक्रेटरी सुहास कांबळे सहसचिव शशिकांत कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सेक्रेटरी व बौद्धाचार्य सुहास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक कवी व बौद्धजन पंचायत समिती मुंबई येथील पर्यटन समितीचे अध्यक्ष मुकुंद महाडिक यांनी वर्षावास कार्यक्रम व भगवान गौतम बुद्धांचा उपदेश याबाबत विविध दाखले देऊन मार्गदर्शन करताना त्यांनी आधी कल्याण मध्य कल्याण याबाबत अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केले व बौद्धांची ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहण्यासाठी धम्म सहली आयोजित केल्या जातात या बाबत ही त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिली.
प्रमुख अतिथी व वक्ते बौद्धजन पंचायत समिती मुंबई मध्यवर्ती कार्यकारिणीचे अतिरिक्त सरचिटणीस श्रीधर साळवी यांनी बौद्धजन पंचायत समितीची स्थापना, तीचे कार्य व भावी वाटचाल कशी शिस्तबद्ध असावी. कार्यालयीन दप्तर कसे हाताळावे व दैनंदिन व मासिक अहवाल असावा. याबाबत अतिशय सुटसुटीत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात आयु. प्रकाश पवार यांनी शाखांना गेली अनेक वर्षे कार्यालयीन कामकाज कसं असावं या बाबत सखोल मार्गदर्शन करीत असतानाही काही शाळांकडून समाधानकारक काम होत नाही, त्यांनी यापुढे चांगले योगदान देत चांगले काम करावे याबाबत कडक सुचना दिल्या. तसेच चांगले काम करणाऱ्या शाखांना अध्यक्ष प्रकाश पवार यांनी धन्यवादही देत कौतुकही केले. शेवटी कवी मुकुंद महाडिक यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवन कार्याचा गौरव करणारे क्रांतीकारक आदर्श गीत सादर केले. सेक्रेटरी सुहास कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले व शरणेत्तय गाथेने सांगता करण्यात आली.