( रत्नागिरी /प्रतिनिधी )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, रत्नागिरी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा गौरव सोहळा दिनांक १९ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी, सिव्हिल हॉस्पिटलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी आपली नावे दिनांक १५ जुलैपर्यंत मा. अध्यक्ष आयु. एल. व्ही. पवार यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शैक्षणिक वस्तू प्रदान करून केला जातो. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह व प्रेरणा निर्माण करणारा ठरतो. यंदाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपला सन्मान प्राप्त करावा, असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार यांनी केले आहे.

