(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांच्या उपस्थितीत वातावरण संपूर्णतः भक्तिमय झाले होते.
दि. १० जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा पार पडली. त्यानंतर सकाळी ८ वाजता पादुकांवर अभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता पुरोहित श्री. प्रकाश फडके यांच्या हस्ते होमहवनाचा विधी पार पडला. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा उत्साहात काढण्यात आली. त्यानंतर १२.३० वाजता आरती झाली आणि दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री ७.३० वाजता शेवटची आरती झाली.
या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर, त्यांच्या पत्नी सौ. गीता पावसकर तसेच सर्व स्वामीभक्तांनी मेहनत घेतली.
फोटो:
1. मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त होमहवन करताना पुजारी श्री. सहदेव पावसकर व त्यांच्या पत्नी सौ. गीता पावसकर.
2. गुरुपौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेली पालखी मिरवणूक.
(छायाचित्र: दिनेश पेटकर, गावखडी)