(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे खारवीवाडा येथे माघी गणेश जयंती उत्सव व श्री राधाकृष्ण मंदिराच्या १२ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त दिनांक १ व ४ फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे व स्थानिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .
शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजता श्री गणेश अभिषेक व काकड आरती, सकाळी ९ वाजता स्थानिक भजने, सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू व तिळगूळ समारंभ, सायंकाळी ७ वाजता सांजआरती, रात्रौ १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रेकॉर्ड डान्स,
रविवार २ फेब्रूवारी रोजी सकाळी ७वाजता श्री राधाकृष्ण मूर्ती अभिषेक व पूजा, सकाळी ८ वाजता स्थानिक भजने, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण सार्वजनिक महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद व तीर्थप्रसाद, दुपारी ३-३० वाजता पालखी मिरवणुक सोहळा, संध्याकाळ ७ वाजता सांज आरती, रात्रौ १० वाजता श्री गजानन सागर माऊली नाट्य मंडळ वरवडे खारवीवाडा निर्मित तीन अंकी सामाजिक नाटक पुरुष.
सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रात्रौ १०वाजता एक अंकी कॉमेडी नाटकांची पर्वणी आयोजित केली गेली आहे रात्रौ १० वाजता हास्य जत्रा प्रहसन, ११ वाजता एक एप्रिल, आणि रात्री १२ वाजता पयल नमन अशा दर्जेदार नाट्यकला कृतींची मेजवानी मंडळाच्या वतीने ठेवण्यात आली आहे.
तसेच मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी श्री राधाकृष्ण चॅम्पियन क्रिकेट ट्रॉफी २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय सोहळ्याला सर्व भाविकांनी हजर राहून आमचा आनंद द्विगुणित करावा व विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राधाकृष्ण सेवा मंडळ व श्री राधाकृष्ण महिला मंडळ वरवडे खारवीवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.