(साखरपा)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पंचक्रोशीतील तिल्लोरी कुणबी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व समाज प्रबोधन सोहळा ६ जुलै रोजी येथील लाड सभागृहात पार पडला. या वेळी पंचक्रोशीतील सुमारे १५० विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य, गुलाबपुष्प आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. सदानंद आग्रे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन करताना सुसंवाद हरवल्याचे सांगून सुसंवाद अत्यंत महत्वाचा आहे असे सांगितले. ते म्हणाले मुलांनी आई-वडिलांच्या वेदना समजून घेतल्या तर यशाचे शिखर गाठणे अवघड नाही. मुलांनी आई- वडिलांची स्वप्न समजून घेतली पाहिजेत आणि संयम अंगिकारला पाहिजे. स्पर्धेच्या युगात मार्कांची तहान ज्ञानामध्ये बदलली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले तर कोणतेही क्षेत्र अवघड नाही मात्र विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने परिश्रम घेतले तर यश दूर नाही.
हा कार्यक्रम तिल्लोरी कुणबी समाज साखरपा पंचक्रोशी या संस्थेचे अध्यक्ष सिताराम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख मान्यवर म्हणून मुंबईचे उद्योजक विष्णूशेठ रामाणे, श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट, सर्वोदय छात्रालय रत्नागिरीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते ॲड. संदिप ढवळ, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य विजय बाईंग, मद्रास येथील उद्योजक शंकरशेठ नवाळे, मुर्शी गावचे माजी सरपंच अमोल लाड, हरीभाऊ धुमक, कुणबी पतसंस्था लांजा, शाखा देवरूखचे शाखाधिकारी गंगाराम कालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जायगडे आणि सूत्रसंचालन यशवंत घागरे यांनी केले. बापू ढवळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रमेश ढवळ, गंगाराम शेलार गुरूजी, रोहिदास मांडवकर, रविंद्र जायगडे, संदिप जोयशी, सुनील शिवगण, पांडुरंग गोरूले गुरुजी, प्रविण बाईंग, अनिल चिंचवळकर, सिताराम करंबेळे गुरूजी, महेश कांबळे गुरूजी, रावण गुरूजी, राजाराम ढोके, जयराम माईन, हरिभाई धुमक, बाळू हातीम, राजेंद्र जोशी, संजय बाईंग, गणपत माईन, सुरेश रामाणे, अशोक सुकम, राजाराम रावण, संभाजी नवाळे, सिध्दी कटम, श्रीपत ढवळ यांनी परिश्रम घेतले.
अॅड. संदीप ढवळ यांनी केले कौतुक
श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदिप ढवळ यांनी साखरपा पंचक्रोशीतील तिल्लोरी कुणबी समाज संस्थेच्या कामाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील गुणवंत मुलांना योग्य मार्गदर्शनासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच रत्नागिरीतील सर्वोदय छात्रालयाची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे पदाधिकारी अमोल लाड, रामचंद्र घाणेकर, शांताराम जाधव गुरूजी यांनी आपल्या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.