(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरीतील अनिल केरु कांबळे (वय 57) हेआंबेडकर वाडी येथून बुधवार दिनांक 2 जुलै 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता “चालायला जातो” असे सांगून घरून निघाले आहेत, मात्र ते अद्याप घरी परतलेले नाहीत. त्यांच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांना एका बाजूचा पक्षाघात (साइड पॅरालिसिस) झाला आहे, त्यामुळे त्यांची हालचाल मर्यादित आहे.
या घटनेमुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक नागरिक चिंतेत असून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. हरविल्याबाबत संबंधित पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. जर कोणी अनिल कांबळे यांना पाहिले असल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास कृपया तात्काळ 9284716813 / 9130357412 या नंबरवर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

