(खेड)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडच्या वतीने आयोजित “गुणवंत पाल्य व शिक्षक सन्मान सोहळा” रविवार, १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत गणेश मंगल कार्यालय, भरणे येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण भूषविणार आहेत.
या सोहळ्यात दहावी, बारावी, तसेच उच्चशिक्षित प्राथमिक शिक्षकांचे पाल्य, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, बीडीएस, एमटीएस परीक्षा, कला-क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त विद्यार्थी, तसेच इस्रो, नासा, होमी भाभा मेडल परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी आणि नेट, सेट, एम.एड., बी.एड., एम.ए. परीक्षांत यश मिळवलेले शिक्षक यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हा परिषद आणि इतर संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा देखील सत्कार होणार आहे.
या सोहळ्यास शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, सरचिटणीस संतोष पावणे, राज्य ऑडिटर अंकुश गोफणे, जिल्हा नेते दिलीप महाडिक, जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव, पतपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे, पतपेढी संचालक सुनील दळवी, जिल्हा प्रतिनिधी श्रीकृष्ण खांडेकर, माजी तालुकाध्यक्ष शरद भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुणगौरवासाठी पात्र विद्यार्थ्यांची नावनोंदणी पुढील समिती सदस्यांकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे:
शैलेश पराडकर, श्रीकृष्ण खांडेकर, अमर चव्हाण, दिलीप यादव, संजय गडाळे, नितीन साळुंखे, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर, नारायण शिरकर, दीपक कांबळे, भरत बोडके, विजय कासार, राजेश भागणे, अनंत मोरे, दिनेश पवार, सतीश गजमल.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव धर्मपाल तांबे, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, उपाध्यक्ष बबन साळवी, कार्यालयीन चिटणीस सुनील पांगुळ आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
या सन्मान समारंभास सर्व प्राथमिक शिक्षक बंधू-भगिनींनी आपल्या गुणवंत पाल्यासह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख शैलेश पराडकर व दिलीप यादव यांनी केले आहे.

