(रत्नागिरी)
उद्या रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळी ९. ३०वा. ‘बालजगत ‘ या कार्यक्रमामध्ये फाटक हायस्कूल रत्नागिरीचे विद्यार्थी सादर करणार आहेत नाटिका ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे’.
नाट्यछटा, भारुड, संगीत, नाटिका, स्वागत, कथा,कविता याद्वारे विद्यार्थी उलगडून दाखवणार आहेत ऋतू आणि निसर्गात होणारे बदल, ऋतूंचे मानवी जीवनावर होणारे परिणाम आणि निसर्गाकडून मानवाने घ्यावयाची शिकवण.
सहभागी कलाकार विद्यार्थी
इरा उदय गोखले, अर्णव मकरंद पटवर्धन, निर्मयी निलेश जोशी, दूर्वा मंगेश मुरुडकर, मुमुक्षा महेश्वर वझे, स्पृहा तेजराज भावे, अवनी आनंद लिमये.
हार्मोनियम साथ केली आहे. मनवा हृषिकेश जोशी, तबला साथ क्रियंश विश्वजीत चव्हाण आणि संहिता लेखन, मार्गदर्शन / दिग्दर्शन प्रकाश अनंत देवरुखकर यांनी केले आहे.

