(देवरूख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यात आगामी मान्सून २०२५ च्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागात आपत्ती व्यवस्थापन तयारी पुर्ण झाली असुन आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे तहसील कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धपत्रक म्हटले आहे.
संंगमेश्वर तालुका नैसर्गिक आपत्तीपुर्व आढावा बैठक दिनांक १९ मे २०२५ रोजी घेण्यात आली होती. याबैठकीमध्ये मान्सून अनुषंगाने प्रत्येक शासकीय विभागांनी त्यांचेकडील मान्सून पूर्वतयारीची कामे पूर्ण करुन आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याच्या देण्यात आलेल्या होत्या. या सूचनेनुसार त्या विभागाचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तसेच ग्रामपंचायत पातळीवर गाव आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करण्यात आले असून तहसीलदार कार्यालय येथे तालुका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रणकक्ष २४ तास कार्यरत सुरु करण्यात आला आहे. आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक ०२३५४ – २६००२४ व मोबाईल क्रमांक ७२४९७८८५७६ असा आहे.
पुर्वानुभवानुसार पाणी भरणे, भूस्खलन, दरड कोसळणे (नदीच्या पुराचे वा धरणामधील पाणी सोडल्यामुळे पाणी भरण्याची शक्यता असलेले, दरडग्रस्त, भूस्खलन, वा अन्य आपत्तीची शक्यता असलेले) प्रामुख्यानेमोठया प्रमाणात घडलेल्या आपत्ती विचारात घेवून मंडळ निहाय गावांच्या तपशिलानुसार सुमारे ५५ ग्रामपंचायती अंतर्गत ६४ गावामधील सुमारे २१ नदीलगत व १४ खाडीलगत असलेल्या सखल भागामध्ये पाणी भरण्याचा धोका व सुमारे ३० गावामधील ठिकाणातदरड कोसळणे वा भुस्खलनाचा धोक्याचा संभव आहे.
मान्सून कालावधीमध्ये तसेच आपत्तीकालावधीमध्ये संपर्कासाठी, पूर्वतयारी व मदतकार्याच्या अनुशंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परीषद बांधकाम उपविभाग, गडगडी नदी प्रकल्प उपविभाग यासारख्या शासकीय विभागामधील कनिष्ठ अभियंता तत्सम अधिकारी, सबंधीत मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राममसहूल अधिकारी, गावचे पोलीस पाटील यांची आपत्तीव्यवस्थापन सहाय्यपथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकामधील नियुक्त अधिकारी कर्मचारीयांच्या मार्फत नेमून दिलेल्यागावामधील आपत्ती अनुशंगाने पाहाणी करुन, मदत कार्याच्या अनुशंगाने पुर्वतयारी करुन आपत्ती व्यवस्थापन सहायय्यक पथके सज्ज करण्यात आली आहेत.
मुख्याधिकारी नगरपंचायत देवरुख याचेकडील नगर पंचायत देवरुख आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा, त्यांचेकडील अग्नीशामक, लाईफ बोये, लाईफजॅकेट यासारखी साधनासह सज्ज आहे. तसेच प्रत्येकग्रामपंचायतीचे ठिकाणी ग्राम आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडयासह गावपातळीवरील शासकीय विभागाचे कर्मचारी यांचेगाव आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज आहेत. त्यांच्याकडे लाईफ जॅकेट, लाईफबोये, गमबुट, रोप (दोरी) यासारखी संसाधने आहेत…
तालुक्यातील राष्ट्रीयमहामार्ग (क्रमांक ६६) मुंबई – गोवा, (क्रमांक १६६ ) रत्नागिरी कोल्हापूर ची मान्सूनआपत्ती व्यवस्थापन अंतर्गत दिनांक २० मे व २७ मे २०२५ रोजीराष्ट्रीय महामार्गाची महसूल विभाग, पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सबंधीत ठेकेदार यांचेसमवेत संयुक्त पाहाणी करण्यात आली असूनराष्ट्रीय महामार्ग विभागचे माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे मध्यवर्ती ठिकाणी जेसीबी, पोकलेन आदी साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तालुका आपत्तीव्यवस्थापनांतर्गत सुमारे ४ पोर्टेबल लाईट, २० लाईफ जॅकेट, लाईफ बोये १५ रॅपलींग रोपर यासारखे साहीत्यही आहे. एकंदरीतसर्व ग्रामपंचायतीमधील गावआपत्ती व्यवस्थापनपथके, शासकीय विभाग व समाजसेवी संस्था, स्वयंसेवी संस्था, राजू काकडे हेल्प अकॅडमी देवरुख, आकार ऑर्गनायझेशन देवरुख, स्वस्तीक युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुका यंत्रणा सज्ज आहे.