(रत्नागिरी)
माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे शनिवारी, दिनांक ३१ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून, विविध बैठका व कार्यकर्ता मेळाव्यांद्वारे पक्षकार्याचा आढावा घेणार आहेत.
दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची अधिकृत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १.३० वाजता चिपळूण येथील शिक्षक पतपेढीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतरचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
तसेच, रविवार दिनांक १ जून रोजी सकाळी ११ वाजता राजापूर येथील आंबेडकर भवन येथे दुसरा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या दौऱ्यात खासदार राणे जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी राजकीय दिशा निश्चित करण्यावर भर देण्याची शक्यता आहे.

