(रत्नागिरी / संतोष पवार)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचातर्फे गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने २६ वे राज्यस्तरीय कवी संमेलन शनिवार दि.१४ रोजी गडचिरोली आयोजित करण्यात आले. नवोदित कवींना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उदात्यहेतूने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) व गडचिरोली जिल्हा कमिटीच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी १० ते सांयकाळी ५ या वेळेत राज्यस्तरीय कविसंमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच गडचिरोली जिल्हा कमिटीचा विशेष सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.
सदरचे राज्यस्तरीय कविसंमेलन नागपूर येथील प्रतिभावंत कवी मंगेश जनबंधू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. १० निमंत्रित कवींचा सहभाग असणार आहे. तर महाराष्ट्रातील ४० कवी सहभागी होणार आहेत .सदर कवी संमेलन निःशुल्क असून एकत्रित स्नेह भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. कवी संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन सोपानदेव मशाखेत्री, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रभाकर दुर्गे गडचिरोली, कवी व साहित्यिक मनोज जाधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष, भावना खोब्रागडे, संस्थेच्या संपादिका यांनी केले आहे.