(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या केंद्र सक्षमीकरण अभियानांतर्गत गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांचा २८ मे ते ५ जून २०२५ दरम्यान मराठवाडा आणि मुंबई दौरा जाहीर झाला असून या दौऱ्यात विविध सेवाकेंद्रांमध्ये ते मार्गदर्शन करतील.
बुधवार दि. २८ मे रोजी सकाळी १०:३० वाजता अहिल्यानगर मधील नवनागापूर श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रात, सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र तुळजापूर येथील जिजामाता नगर केंद्रात, गुरुवार दि. २९ मे रोजी सकाळी १०:३० वाजता उदगीर (लातूर) येथील रामचंद्र नगर नांदेड रोडवरील सेवा केंद्रात आणि सायंकाळी सहा वाजता नांदेड मधील मगनपुरा सेवाकेंद्रात, दि ३० मे रोजी सकाळी १०:३० वाजता हिंगोली येथील नाईक नगर केंद्रात तर सायंकाळी सहा वाजता जिंतूर मधील आमदार कॉलनी सेवा केंद्रात, दि.१जून रोजी सकाळी १०:३० वाजता जालना आणि सायंकाळी सहा वाजता संभाजीनगर मधील सेवाकेंद्रात केंद्र सक्षमीकरणावर श्री.मोरे मार्गदर्शन करतील.
५ जूनला नवीमुंबई, बदलापूरमध्ये मेळावा
मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे ५ जून रोजी नवी मुंबई ऐरोली सेक्टर १० मधील कोळीवाडा केंद्र दिवा नगर आणि सायंकाळी ५:३० वाजता बदलापूर(पश्चिम)येथील रमेश वाडी समर्थ नगर सेवाकेंद्रात सेवेकर्यांना संबोधित करतील. तरी सेवेकर्यांनी मोठे संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.