आज (मंगळवार, २७ मे रोजी) शनी जयंती साजरी केली जाणार आहे. हा दिवस ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला येतो आणि शनिदेवाचा जन्मोत्सव म्हणून श्रद्धा व भक्तीभावाने साजरा केला जातो. शनिदेव हे न्यायाचे दैवत मानले जातात. ते माणसाला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. असे मानले जाते की शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष, साडेसाती आणि ढैय्या यांसारख्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात शुभ फलप्राप्ती होते. शनिदेवाची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. यासोबतच आर्थिक संकटही दूर होते, अशी मान्यता आहे.
यावेळी ज्येष्ठ महिन्यातील तिसरी बुधवारी मंगल आणि शनि जयंती 27 मे रोजी साजरी केली जाईल. वैदिक कॅलेंडरनुसार, ही तारीख 26 मे रोजी दुपारी 12:11 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 मे रोजी रात्री 8:31 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, शनि जयंती मंगळवार, 27 मे रोजी साजरी केली जाईल. तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्याची तुम्ही शनिवारी आणि मंगळवारी योग्य पद्धतीनं पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात.
शनिदेवाचे ज्योतिषीय महत्त्व
आचार्य पप्पू पांडे यांच्या मते, शनिदेव हे भगवान सूर्य आणि छाया यांचे पुत्र आहेत. ते नवग्रहांमध्ये सर्वात मंदगतीने चालणारा ग्रह असला तरी, त्यांचा प्रभाव सर्वाधिक मानला जातो. शनिदेवांचे स्वरूप कठोर असले तरी ते धर्म, शिस्त आणि न्यायाचे प्रतीक आहेत. जे शिस्तप्रिय, संयमी आणि परिश्रमी असतात, त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा होते. त्यांची उपासना केल्याने जीवनात स्थैर्य आणि शिस्त येते.
शनी जयंती विशेष पूजा आणि दान
या दिवशी शनी मंदिरात जाऊन पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीचे तेल, निळी फुले, काळी उडीद, तीळ आणि काळे कपडे अर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच:
-
“ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
-
शनि चालिसा आणि दशरथ रचित शनिस्तोत्र पठण करा.
-
गरीब व गरजू व्यक्तींना काळे कपडे, काळी डाळ, तीळ, अन्नधान्य आणि लोखंडाच्या वस्तूंचे दान करा.
-
या दिवशी सकाळी उठून स्नान करा आणि हनुमानजींची पूजा करा. त्यांना सिंदूर, चमेलीचे तेल, लाल फुले आणि गूळ आणि हरभरा अर्पण करा. यानंतर हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण पाठ करा. यानंतर, भगवान शनिदेवाची पूजा करा. त्याला काळे तीळ, मोहरीचे तेल, निळे फुले आणि काळे कपडे अर्पण करा. दशरथ लिखित शनि स्तोत्र किंवा शनि स्तोत्र पाठ करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि त्याची 7 वेळा प्रदक्षिणा करा.
-
जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर पूजेदरम्यान ओम ह्रं हनुमते नम: या मंत्राचा जप करावा. यासोबतच हनुमानजींना फळे आणि बूंदी अर्पण करा. असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने जीवनात शुभ फळे मिळतात.
पूजेचे फायदे आणि घ्यावयाची खबरदारी
-
शनिपूजनामुळे साडेसाती व ढैय्याचे दुष्परिणाम कमी होतात.
-
अडथळे, मानसिक तणाव व अपघातांपासून संरक्षण मिळते.
-
आजीवन शांती, शिस्त आणि स्थैर्याची अनुभूती होते.
परंतु, या दिवशी काही चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे:
-
मद्यपान आणि मांसाहार टाळा.
-
कोणत्याही व्यक्तीस अन्यायकारक वागणूक देऊ नका.
-
अपशब्द, राग आणि अपमानास्पद वर्तन टाळा.
शनी जयंती ही केवळ धार्मिक पूजा नसून, आत्मपरीक्षण आणि संयमाचे स्मरण करून देणारा पवित्र दिवस आहे. शनिदेवाच्या कृपेने जीवनात सकारात्मकता नांदते, अशी श्रद्धा आहे.
शनिदेवाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर न्यायदेवतेची पूजा विधीनुसार करा. त्याबरोबरच पूजेच्या वेळी शनी चालिसाचे पठण करा.
दोहा
श्री शनिश्चर देवजी,सुनहु श्रवण मम् टेर।
कोटि विघ्ननाशक प्रभो,करो न मम् हित बेर॥
सोरठा
तव स्तुति हे नाथ,जोरि जुगल कर करत हौं।
करिये मोहि सनाथ,विघ्नहरन हे रवि सुव्रन।
॥ चौपाई ॥
शनिदेव मैं सुमिरौं तोही।
विद्या बुद्धि ज्ञान दो मोही॥
तुम्हरो नाम अनेक बखानौं।
क्षुद्रबुद्धि मैं जो कुछ जानौं॥
अन्तक, कोण, रौद्रय मनाऊँ।
कृष्ण बभ्रु शनि सबहिं सुनाऊँ॥
पिंगल मन्दसौरि सुख दाता।
हित अनहित सब जग के ज्ञाता॥
नित जपै जो नाम तुम्हारा।
करहु व्याधि दुःख से निस्तारा॥
राशि विषमवस असुरन सुरनर।
पन्नग शेष सहित विद्याधर॥
राजा रंक रहहिं जो नीको।
पशु पक्षी वनचर सबही को॥
कानन किला शिविर सेनाकर।
नाश करत सब ग्राम्य नगर भर॥
डालत विघ्न सबहि के सुख में।
व्याकुल होहिं पड़े सब दुःख में॥
नाथ विनय तुमसे यह मेरी।
करिये मोपर दया घनेरी॥
मम हित विषम राशि महँवासा।
करिय न नाथ यही मम आसा॥
जो गुड़ उड़द दे बार शनीचर।
तिल जव लोह अन्न धन बस्तर॥
दान दिये से होंय सुखारी।
सोइ शनि सुन यह विनय हमारी॥
नाथ दया तुम मोपर कीजै।
कोटिक विघ्न क्षणिक महँ छीजै॥
वंदत नाथ जुगल कर जोरी।
सुनहु दया कर विनती मोरी॥
कबहुँक तीरथ राज प्रयागा।
सरयू तोर सहित अनुरागा॥
कबहुँ सरस्वती शुद्ध नार महँ।
या कहुँ गिरी खोह कंदर महँ॥
ध्यान धरत हैं जो जोगी जनि।
ताहि ध्यान महँ सूक्ष्म होहि शनि॥
है अगम्य क्या करूँ बड़ाई।
करत प्रणाम चरण शिर नाई॥
जो विदेश से बार शनीचर।
मुड़कर आवेगा निज घर पर॥
रहैं सुखी शनि देव दुहाई।
रक्षा रवि सुत रखैं बनाई॥
जो विदेश जावैं शनिवारा।
गृह आवैं नहिं सहै दुखारा॥
संकट देय शनीचर ताही।
जेते दुखी होई मन माही॥
सोई रवि नन्दन कर जोरी।
वन्दन करत मूढ़ मति थोरी॥
ब्रह्मा जगत बनावन हारा।
विष्णु सबहिं नित देत अहारा॥
हैं त्रिशूलधारी त्रिपुरारी।
विभू देव मूरति एक वारी॥
इकहोइ धारण करत शनि नित।
वंदत सोई शनि को दमनचित॥
जो नर पाठ करै मन चित से।
सो नर छूटै व्यथा अमित से॥
हौं सुपुत्र धन सन्तति बाढ़े।
कलि काल कर जोड़े ठाढ़े॥
पशु कुटुम्ब बांधन आदि से।
भरो भवन रहिहैं नित सबसे॥
नाना भाँति भोग सुख सारा।
अन्त समय तजकर संसारा॥
पावै मुक्ति अमर पद भाई।
जो नित शनि सम ध्यान लगाई॥
पढ़ै प्रात जो नाम शनि दस।
हैं शनिश्चर नित उसके बस॥
पीड़ा शनि की कबहुँ न होई।
नित उठ ध्यान धरै जो कोई॥
जो यह पाठ करैं चालीसा।
होय सुख साखी जगदीशा॥
चालिस दिन नित पढ़ै सबेरे।
पातक नाशै शनी घनेरे॥
रवि नन्दन की अस प्रभुताई।
जगत मोहतम नाशै भाई॥
याको पाठ करै जो कोई।
सुख सम्पति की कमी न होई॥
निशिदिन ध्यान धरै मनमाहीं।
आधिव्याधि ढिंग आवै नाहीं॥
॥ दोहा ॥
पाठ शनिश्चर देव को,कीहौं ‘विमल’ तैयार।
करत पाठ चालीस दिन,हो भवसागर पार॥
जो स्तुति दशरथ जी कियो,सम्मुख शनि निहार।
सरस सुभाषा में वही,ललिता लिखें सुधार॥