(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी पोलीस अधीक्षक बगाटे यांचे रत्नागिरीत आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी पोलीस दलाकडून औपचारिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक नितीन ढेरे हेही उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेच्या अधिक बळकटीस निश्चितच उपयोग होईल, अशी आशा पोलीस विभाग तसेच नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात येईल आणि पोलिसी कार्यवाही अधिक गतिमान व परिणामकारक होईल, अशी अपेक्षा आहे.