(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादविरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीत अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या १३ बांग्लादेशी नागरिकांचा पर्दाफाश करण्यात आला. या सर्व नागरिकांचे दिनांक २० मे २०२५ रोजी त्यांच्या मायदेशी बांग्लादेशात प्रत्यार्पण करण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आले आहे.
११ नोव्हेंबर २०२४ रोजी मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता खालील १३ बांग्लादेशी नागरिक आढळून आले. यामध्ये वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजु अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही वैध दस्तावेज नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर पासपोर्ट कायदा व परदेशी व्यक्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयीन कारवाई आणि शिक्षा
या प्रकरणाचा तपास पूर्णगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. रत्नदीप साळोखे यांनी केला. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी करत मा. निखिल गोसावी, मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी यांनी सर्व १३ आरोपींना प्रत्येकी ६ महिन्यांची साधी कैद व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
प्रत्यार्पणाची यशस्वी अंमलबजावणी
शिक्षा भोगल्यानंतर रत्नागिरी पोलीस दलाने संबंधित केंद्र व एजन्सींच्या समन्वयातून या बांग्लादेशी नागरिकांच्या प्रत्यार्पणाची कार्यवाही राबवली. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, व स्था.गु.शा प्रभारी अधिकारी श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली. या कारवाईत,पोनि. श्री. विवेक पाटील, स.पो.नि. श्री. रत्नदीप साळोखे, पो.उनि. श्री. योगेश खोंडे, पो.हवा. श्री. संतोष कोळेकर, श्री. संतोष करळकर, श्री. प्रवीण पाटील, श्री. नितीन डोळस, पो.शी. श्री. दत्तात्रय शिंगारे, श्री. अभय गायकवाड, श्री. प्रवीण चौगुले, श्री. संहिल गाडेकर, श्री. जितेंद्र लाहानगे, श्री. सूरज पन्हाळकर आदी सहभागी होते.