(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
कोंड असुर्डे गावाचे जेष्ठ नागरिक श्रीकांत शिंदे (भाऊ ) यांचे वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 19 वर्षांपासून फणसवणे येथे ते किराणा मालाचा व्यवसाय करत होते. फणसवणे ते नायरी या पंचक्रोशी ते शिरीभाऊ या नावाने परिचित होते.
त्यांच्या पश्चात रविकांत, संजय, संदीप तीन मुलगे सुना नातं भाविका नातू आर्य आणि गगन आहेत. अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.