(दापोली)
जालगाव (दापोली) गावचे सुपुत्र ॲड. नितीन कल्पना यशवंत तांबे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या वतीने दि. ३ मे २०२५ रोजी कन्याकुमारी (तामिळनाडू) स्वामी विवेकानंद केंद्र येथे पीएचडी प्रदान करण्यात आली. ॲड. नितीन कल्पना यशवंत तांबे हे गेली १५ वर्ष सामाजिक कार्यात आपले काम करत आहेत. त्यांना या आधी राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी युवक कल्याण, पंचायत राज, मानवी हक्क चळवळ, शासकीय विभागाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी पथनाट्यच्या माध्यमातून जन जनजागृतीत सहभाग घेतला आहे. अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात असतात.
या कार्यक्रमास डॉ. पी. मनुले (संस्थापक अध्यक्ष ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी), जस्टिस के. वेंकटेश (Vice chancellor ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी) ठावथीरु स्वामी पद्मेंद्रा (अध्यक्ष तामिळनाडू वॉलर पेरावी नागरकोईल) श्री. एन. सेल्वराजन ( हेड ऑफ ॲटोमिक अनर्जी कन्याकुमारी) के. संपतकुमार ( IAS) ये. तरुणीला प्रसाद ( जस्टिस CBI court Tamilnadu) डॉ. इ. माँ. मसमथू (IPS inspector general of police TN) आणि इतर क्षेत्रातील मनावर उपस्थित होते.

