(खेड)
तालुक्यातील लोटे येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर येथे आजी आजोबा दिवस संपन्न झाला. हा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्साहात आणि अगदी मोकळ्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात आजी आजोबा आपल्या नातवंडांसोबत अगदी लहान होऊन खेळले आणि नाचले सुद्धा.
कार्यक्रमात प्रथम नातवंडांनी आपल्या आजी आजोबांचे औक्षण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबा प्रति तसेच आपल्या पालकांप्रती कृतज्ञता आणि प्रेम नृत्यातून व्यक्त केली. त्यानंतर आजी आजोबांना पुन्हा लहान होण्याचा अनुभव मिळण्यासाठी आजी आजोबांचे फनी गेम घेतले. त्यात सर्व आजी आजोबांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच शेवटी सर्व आजी आजोबानी डान्स करून खूप धमाल केली.
या कार्यक्रमामध्ये आजी आजोबांचा सत्कार करण्यात आला. आजी आजोबांनी आपल्या मनोगतात कार्यक्रमाचे, नियोजनाचे, शिस्तीचे, शाळेतील शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. आमची नातवंडे ह्या शाळेत शिकत आहेत ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली. सदर कार्यक्रम व्यवस्थितपणे संपन्न होण्यासाठी प्राथमिक विभागाचे विभाग प्रमुख श्री जाधव नितीन सर, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख सौ शालिनी धापसे मॅडम तसेच प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी विशेष मेहनत घेतली. हा कार्यक्रम आयोजित करण्यास संस्थेने परवानगी दिली आणि मोलाचे सहकार्य केले, त्यासाठी सर्व संस्था पदाधिकारी संचालक ह्यांचे मनापासून आभार मानण्यात आले. तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री बसवंत सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले. तसेच कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व आजी आजोबा आणि पालक ह्या सर्वांचे सुद्धा आभार मानण्यात आले.