(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (HSC) परीक्षेचा निकाल (Results) आज दिनांक ०५ मे २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता घोषित करण्यात आला. त्यामध्ये लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे रत्नागिरी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखली असून, विज्ञान १००% , वाणिज्य १००% व कला ८४.६२% लागला आहे.
विज्ञान शाखा
प्रथम क्रमांक-
कु जिया चंद्रशेखर आडविरकर ८०.००%
द्वितीय क्रमांक
कु – तनुजा संजय मेस्त्री ७२.००%
तृतीय क्रमांक-
कु – दिक्षा प्रदिप कुड ६८.००%
वाणिज्य शाखा
प्रथम क्रमांक –
कु – पूजा प्रमोद जुवळे ७४.००%
द्वितीय क्रमांक-
कु – ऋषिकेश प्रकाश गितये ६९.००%
तृतीय क्रमांक
कु – कल्याणी जनार्दन आग्रे ६६.००%
कला शाखा
प्रथम क्रमांक-
कु – शामल संतोष आडविलकर ६६.००%
द्वितीय क्रमांक-
सुयोग संतोष गिजबिले ६४.००%
तृतीय क्रमांक-
कु. – रिया रमेश पेजे ६३.००%
या यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण संकुलामध्ये व पंचक्रोशीमध्ये कौतुक होत असून मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचेही अभिनंदन केले जात आहे. नंदकुमारजी मोहिते यांची प्रेरणा व मुख्याध्यापक श्री. थुळ यांचे या विद्यार्थांना मार्गदर्शन लाभले आहे. संस्था पदाधिकारी व मुंबई शिक्षण कमिटीनेही या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.