(रत्नागिरी)
आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनी दिव्यांग पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते. यावर्षीचा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार 85% दिव्यांगत्वावर मात करत यशस्वी फॅशन अँड प्रॉडक्ट फोटोग्राफर अक्षय संतोष परांजपे यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे वितरण समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात स्व. शामरावजी पेजे सभागृहात करण्यात आले होते. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व 5000/- चा धनादेश असे होते. या प्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे ॲड. अजित वायकुळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय सिंह जाधव, (सामान्य प्रशासन), आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी च्या सचिव श्रीम. सुरेखा पाथरे, खजिनदार श्रीम. साक्षी चाळके, आस्था दिव्यांग हेल्पलाईन चे जिल्हा समन्वयक श्री संकेत चाळके, आस्था थेरपी सेंटरच्या प्रमुख श्रीम. संपदा कांबळे व आस्था चे सर्व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे पालक उपस्थित होते.