( रत्नागिरी )
हज यात्रेकरूंसाठी समाजसेवक एजाज इब्जी यांच्या प्रयत्नामुळे फाॅरेन ट्राॅव्हेल कार्ड सुरू झाल्यानंतर एजाज इब्जी यांनी सर्व यात्रेकरूंना हे कार्ड वापरणे शक्य नसल्याबाबत बँक मॅनेजर प्रियेश मालवीय यांच्याकडे सांगितल्याने प्रियेश मालवीय, अभिषेक दास, ऋषीकेश, प्रभु चाबूकस्वार, संदेश सातवडेकर तसेच मुंबई येथील स्टेट बँकेचे निवृत्त कर्मचारी अख्तर चर्निया यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे सऊदी चलन रियाल स्वरुपात मिळवून देण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी यांच्या वतीने जिल्ह्यातील पहिले रियाल वाटप एजाज इब्जी यांना देऊन सदर योजना सुरू झाल्याबाबत जाहीर केले.
बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सांगितले की, हज यात्रेकरूंना शक्य तेवढे सहकार्य करण्यात येईल. मात्र हज यात्रेकरूंचे २०२४/२०२५ इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले असणे आवश्यक आहे. हज यात्रेकरूंना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरीकडून उत्तम सेवा दिली जात असल्याने समाजसेवक एजाज इब्जी यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.