(दापोली / सुदेश तांबे)
दापोली शहरातील मच्छीमार्केट परिसरातील रहिवासी आणि केवळ १० वर्षांची चिमुरडी संकृती फुटाणकर हिचे बुधवारी सकाळी अंदाजे आठ वाजता अचानक दु:खद निधन झाले. अत्यंत गोड, हसतमुख आणि स्नेही स्वभावाची संकृती सर्वांच्या लाडकी होती. तिच्या अकस्मात निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, शेजारी, नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे.
संकृतीचे अंत्यसंस्कार बुधवारी दापोली येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात पार पडले. या दुःखद प्रसंगात फुटाणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नागरिकांनी कुटुंबियांच्या दुःखात सामील होत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संकृतीच्या आठवणी कायम स्मरणात राहतील, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.