(गुहागर)
तालुक्यातील अंजनवेल सडेवाडी येथे २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे अंजनवेल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार विजय सैतवडेकर (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. ओंकार हा आपल्या राहत्या घरातील किचनच्या छतावरील भाल्याला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्र. १९/२०२६) करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे सैतवडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

