(रत्नागिरी)
तालुक्यातील कर्ला भंडारवाडी (ता. व जि. रत्नागिरी) येथील रहिवासी विनेश विठोबा सर्वे (वय ५३ वर्षे) यांचे, शुक्रवार (२६ एप्रिल) रोजी सकाळी उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दुःखद निधन झाले.
प्राप्त माहितीनुसार, विनेश सर्वे यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे ते कामावरून थेट घरी परतले होते. त्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील डॉ. ढेकणे यांच्याकडे वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार घेतले. घरी परत आल्यावर औषधे घेऊन ते विश्रांती घेत असताना त्यांची तब्येत अधिक बिघडली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांचे नातेवाईकांनी तत्काळ त्यांना नरेश विठोबा सर्वे यांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल केले.
सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचाऱ्यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता, अखेर ते मृत घोषित करण्यात आले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४१/२०२५ अन्वये बी.एन.एस.एस. १९४ कलमानुसार करण्यात आली आहे.