(देवरूख / सुरेश सप्रे)
तालुक्यातील देवरूख जवळील किरदाडी गावाच्या श्रीमती अंजिरा सिताराम पेडणेकर यांचा शतकोमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व उत्साहात आज सायंकाळी किरदाडी येथील घरी साजरा करण्यात येणार आहे.
श्रीमती अंजीरा पेडणेकर या मनमिळाऊ व परोपकारी वृत्तीच्या असल्याने आपल्या शेतीवाडीकडे लक्ष देत सामाजिक भान जपत पंचक्रोशीतील विविध कार्यक्रमात भाग घेत अनेकांना मदतीचा हात देत असतात. आपल्या आर्थिक स्थितीचा विचार न करता त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देताना आपल्या दशक्रोशीतील युवकांनी ही शिकले पाहिजे या विचाराने जून्याकाळात एकमेव असलेल्या कोंडकदम आंबव या शाळेत युवकांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आपल्या घरी राहणे व खाण्याची सोय करत असत. त्या उत्तम गृहीणी म्हणूनही प्रसिद्ध असलेने गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जेवणावळींची जबाबदारी पार पाडत असत.
श्रीम. अंजिरी या महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य असलेले सामाजिक कार्यकर्ते कै.बळीराम तथा भावजी
पेडणेकर यांच्या मातोश्री व विद्यमान सरपंच सुबोध पेडणेकर यांच्या आजी असून माजी आमदार व शिवसेनेचे नेते सुभाष बने व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने यांची बहीण वासंती यांच्या सासूबाई आहेत.
अशा या जून्याकाळातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेल्या अंजिराआजी आज १०० वर्षाच्या होत असल्याने त्यांचा शतकोमहोत्सव माजी आमदार सुभाष बने यांच्या कुटुंबीयांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात येत आहे.