(चिपळूण)
तालुक्यातील धामणंद गावात पंधरा गावांच्या संयुक्त वतीने आंतरराष्ट्रीय जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणादायी व्याख्याने आणि दिव्यांग व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यामुळे हा उपक्रम विशेष ठरला.
या कार्यक्रमाला गाव प्रशासनातील मान्यवरांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन दिले. सरपंच राजेन्द्र भिखाजी वाघमारे, उपसरपंच शिवानी शाम पालांडे, पोलीस पाटील अनंत जानु जानकर आणि सलागार जयराम बाजीराव पालांडे यांनी सामाजिक संवेदनांना अधोरेखित करणारी मते व्यक्त केली. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्रहार पंधरा गाव दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. अध्यक्ष सुनील धोंडु जंगम, उपाध्यक्ष धोंडु गंगाराम चव्हाण, सचिव सुमित संतोष भेलेकर, सेक्रेटरी अमित दताराम ऊतेकर, सहसचिव मंगेश हरिचंद्र मेस्त्री, कार्याध्यक्ष अनील अर्जुन जाधव तसेच सदस्य सुरज सुनील ऊतेकर आणि सुनील रामचंद्र कारेते यांनी कार्यक्रमात संयोजनाची जबाबदारी पार पाडली.
समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाचा संदेश अधोरेखित केला. समावेशकतेच्या मूल्यांना बळकटी देत धामणंद येथे साजरा झालेला दिव्यांग दिन हा उपक्रम ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.

