(नागपूर)
राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) गट ‘अ’ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील एकूण २७९५ पदे भरतीसाठी मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. त्यानुसार आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली असून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
भरती तपशील:
-
पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी
-
भरती करणारी संस्था : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
-
पदसंख्या : २७९५
-
गट : गट ‘अ’
-
शैक्षणिक पात्रता : पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुसंवर्धन पदवी
-
अर्ज करण्याची मुदत : २९ एप्रिल ते १९ मे २०२५
-
अधिक माहिती व अर्जासाठी संकेतस्थळ : MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर
राज्यात पशुधन विकास अधिकारी संवर्गात एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १८८६ पदे भरलेली असून २७९८ पदे रिक्त आहेत. याशिवाय ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आणखी ८ पदे सेवानिवृत्तीनंतर रिक्त होणार आहेत. त्यामुळे विभागात एकूण २८०६ पदे रिक्त होती, ज्यामुळे ग्रामीण भागातील सेवा कार्यात अडथळे येत होते. ही बाब लक्षात घेऊन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने कारवाई करत भरती प्रक्रिया गतिमान केली. याआधी जाहिरात क्र. १२/२०२२ अंतर्गत प्रतिक्षायादीतील ११ पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे, आणि उर्वरित २७९५ पदांसाठी ही नवीन भरती होणार आहे.