(मुंबई)
रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने अप्रेंटिसशिप अंतर्गत 2,865 पदांची भरती जाहीर केली आहे. यासाठी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
पदांचे प्रवर्गनिहाय तपशील :
- सामान्य प्रवर्ग : 1,150 पदे
- अनुसूचित जाती : 433 पदे
- अनुसूचित जमाती : 215 पदे
- इतर मागासवर्गीय (OBC) : 778 पदे
- आर्थिक दुर्बल घटक (EWS) : 289 पदे
पात्रता निकष :
- वय मर्यादा : किमान 18 वर्षे व कमाल 24 वर्षे
- अनुसूचित जाती-जमातींना 5 वर्षे सूट
- ओबीसींना 3 वर्षे सूट
- दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता :
- किमान 50% गुणांसह 10 वी व 12 वी उत्तीर्ण
- व्यावसायिक पात्रता : एनसीव्हीटी / एससीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआय प्रमाणपत्र अनिवार्य
निवड प्रक्रिया :
-
कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही
-
उमेदवारांची निवड केवळ 10 वी व 12 वीच्या गुणांवर आधारित असेल
- अर्ज शुल्क :
-
सामान्य, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्ग : ₹100
-
एससी / एसटी उमेदवार : सूट
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :
-
पासपोर्ट आकाराचा फोटो
-
10 वीचे प्रमाणपत्र
-
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
-
आयटीआय प्रमाणपत्र
रेल्वेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 30 ऑगस्टपासून अर्ज करणे सुरू करावे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर wcr.indianrailways.gov.in उपलब्ध आहे.

