(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी ते भोके रेल्वेस्टेशनदरम्यान पटना सुपरफास्ट एक्स्प्रेसची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता घडली.
मृत महिलेचे नाव जयश्री जयवंत शिंदे असे आहे. रेल्वे पोलिस हवालदार अनंत तुकाराम सुचारे यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मध्यरात्री टीसीकडून माहिती मिळाल्यानंतर जखमी महिलेला रेल्वे स्टेशनवर आणून तिथून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र पहाटे ४ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
महिलेकडे आधारकार्ड सापडल्याने तिची ओळख पटली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.