(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देऊड लावगणवाडी नं.२ येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री महादेव भागोजी घाणेकर यांच्या संकल्पनेतून व संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने उत्पन्न दाखला वितरण शिबीर यशस्वीपणे पार पडले.
आर्थिक वर्ष २०२४-२५ संपताच ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना व शालेय परिसरातील पालकांना उत्पन्नाचा दाखला मिळावा त्याचबरोबर शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला दाखला मिळण्यासाठी होणारी धावपळ, लागणारा वेळ याचा त्रास वाचवण्यासाठीच अशा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील जवळजवळ १५० लाभार्थ्यांनी उत्पन्न दाखल्यासाठी प्रस्ताव सादर केले. लवकरच हे दाखले लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला विविध योजनांचा तत्काळ लाभ घेण्याच्या दृष्टीने हे शिबीर उपयुक्त ठरले आहे.
शिबीर यशस्वी करण्यासाठी उपसरपंच श्री. संदिप घाणेकर, गावातील पालक,आजी-माजी विद्यार्थी, ग्राममहसूल अधिकारी श्रीम. पोवार व श्री. सोहनी या सर्वांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महादेव घाणेकर, उपाध्यक्षा श्रीम. रोहिणी घाणेकर , शिक्षणप्रेमी प्रतिष्ठीत नागरिक श्री.रविंद्र (बाळाशेठ) देसाई ,श्री. दीपक घाणेकर, श्री. मंगेश घाणेकर श्रीम. दिव्या खापले ग्रामपंचायत सदस्या व श्री.महेश दत्ताराम घाणेकर, मुख्याध्यापक श्री. रमेश शिदे व शिक्षकवृंद यांनी आपला अमूल्य वेळ देऊन विशेष मेहनत घेतली. शिबीर आयोजनाबद्दल गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.