(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरी नजीकच्या कारवांचीवाडी येथे रविवारी २० एप्रिल रोजी सम्यक संबुध्द समाज मंडळ कारवांचीवाडी परिसर रत्नागिरी, भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा कारवांचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आयु.बळीराम गवई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाला महिला मंडळाच्या अध्यक्षा अनुष्का मोरे व पोलीस पाटील स्वाती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार धम्मचारी सुनंदक यांनी “छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन दिले. धम्मचारी सुनंदक यांची ओळख धम्ममित्र आयु. संतोष गमरे यांनी करून दिली. तसेच लांजा महाविद्यालयाचे प्राध्यापक व धम्मचारी डॉ. प्रज्ञावज्र यांचीही उपस्थिती कार्यक्रमास लाभली.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनाची, शौर्याची आणि सामाजिक न्यायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची सखोल मांडणी करण्यात आली. उपस्थितांनी या कार्यक्रमाचा लाभ घेत प्रेरणा प्राप्त केली..कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. आयोजक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.