(पाली / वार्ताहर)
पालकमंत्री उदय सामंत यांनी पाली ग्रामीण रुग्णालय येथे नव्याने सुरू झालेल्या महाडायलिसिस केंद्राची पाहणी केली. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा हि आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची व रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. या भेटी दरम्यान त्यांनी डॉक्टर, कर्मचाऱ्यांशी व डायलिसिस तंत्रज्ञ यांच्याची सविस्तर चर्चा करत त्यांच्या कामाचा आढावा घेतला. रुग्णसेवीतील सुधारणा, सुविधा आणि स्थानिक लोकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेची गुणवत्ता याबद्दल माहिती घेतली. ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे डायलिसिस केंद्र महत्त्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भेटी दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भास्कर जगताप,उपविभागीय अधिकारी जीवन देसाई ,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकिय अधिक्षक डॉ.विकास कुमरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन साळुंखे, ग्रामीण रुग्णालय पालीचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
फोटो – पाली ग्रामीण रुग्णालयातील महाडायलिसिस केंद्राची पाहणी करताना पालकमंत्री उदय सामंत, डॉ.भास्कर जगताप, डॉ विकास कुमरे, व मान्यवर.