(रत्नागिरी / वार्ताहर)
मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त आज (दिनांक १९ एप्रिल २०२५) रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून राजकारण करत असताना समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेने आज करबुडे जिल्हा परिषद गटातील करबुडे विद्यालयास स्वनिधीतून मोफत संगणक संच ( डेस्कटॉप कम्प्युटर) भेट देण्यात आला.
याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, या शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय राऊत, श्री. जाधव, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री दिनेश रामगडे, करबुडे ग्रामपंचायत सदस्या सौ. नेहा रामगडे, स्थानिक मनसे तालुका उपाध्यक्ष श्री राजू पाचकुडे, तालुका सचिव ॲड. अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष श्री सौरभ पाटील, महिला सेना तालुका सचिव सौ आकांक्षा पाचकुडे, विभाग अध्यक्ष श्री सोम पिलणकर आदी मनसे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
तसेच आज रत्नागिरी तालुका मनसेतर्फे जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे बालरुग्ण कक्षातील रुग्णांना फळवाटप देखील करण्यात आले.