( संगमेश्वर / प्रतिनिधी )
ज्ञान प्रबोधिनी स्थायी संपर्क केंद्र चिपळूण व आंबडस हायस्कूल प्राथमिक विभाग सेमी इंग्रजी माध्यम यांच्या एकत्र नियोजनातून झालेल्या ‘हिरकणी’उपक्रमाचा समारोप मेळावा १४ एप्रिल ला आंबडस हायस्कूल येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भावसार सर (मुख्याध्यापक, संस्कार व्हॕली ), ज्ञानप्रबोधिनी चिपळूण केंद्राचे कार्यकर्ते, आंबडस हायस्कूलचे पदाधिकारी व हिरकणी माता उपस्थित होत्या
हिरकणी उपक्रम म्हणजे शिवरायांच्या काळातील आपल्या तान्हुल्यासाठी धडपडणाऱ्या हिरकणी सारखीच आधुनिक हिरकणी ची मनोवृत्ती घडवणे. विशेषतः ग्रामीण भागातील शून्य ते सहा ते अशा वयोगटातील मुलांच्या माता पालकांसाठी घेतला जाणारा हा उपक्रम आंबडस गावातील मागील चार महिन्यात सततच्या संपर्कातून यशस्वीरित्या संपन्न झाला. घरातील आहे ती साधने वापरून,आपले काम करता करता, पण हेतुपूर्वक आईने मूलाला घडविले तर त्या बालकाची निरीक्षण शक्ती, एकाग्रता, स्पर्श, आकार, रंग ओळख अशी अनेक कौशल्ये विकसित होतात .आईला मातृत्वाचा आनंद मिळतो. नक्कीच हे मूल वेगळे घडते. मातेला मुलाशी अर्थपूर्ण संवादाची नकळत सवय लागते आणि वेगळ्या प्रकारे मुलांची उच्चतम ग्रहण शक्ती असणाऱ्या वयात चांगले संस्कार होतात असा अनुभव या हिरकणी उपक्रमाच्या दरम्यान सगळ्यांनी घेतला.
६ जानेवारीला सुरुवात झालेल्या हिरकणी उपक्रमाची सुनियोजित सहा सत्र आंबडस गावात संपन्न झाली. या सहा-सत्रांचा क्रमशः नियोजित अभ्यासक्रम सत्र घेणाऱ्या मार्गदर्शकांनी उपक्रम प्रमुख वैद्य स्वातीताई मुसळे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरित्या प्रशिक्षणार्थींपर्यंत पोहोचवला १४ एप्रिलला हिरकणी उपक्रमाचा समारोप मेळावा आंबडस प्रशालेच्या प्राथमिक विभागात संपन्न झाला.

