(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, सकाळी ८ वाजता पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा, दुपारी १२.३० वाजता आरती तर दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेर्वी श्री स्वामी समर्थ मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यांनी केले आहे.

