(रत्नागिरी)
आविष्कार शिक्षण संस्थेमधील मतिमंद मुलांना क्रिकेटचा आनंद घेता यावा यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी यांनी आज शिवरुद्र स्पोर्ट्स टर्फ ग्राउंड,शांति नगर येथे क्रिकेटचे आयोजन केले होते. मुलांनी मनसोक्त क्रिकेट खेळून आपला आनंद व्यक्त केला. कार्यक्रमावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.रुपेश पेडणेकर, सचिव अॅंड.मनिष नलावडे, रोटे.निलेश मुळ्ये, रोटे.प्रमोद कुलकर्णी, योगेश कोतवडेकर,आविष्कार संस्थेचे शिक्षक श्री.दीप्तेश पाटील, श्री.राकेश पाटील उपस्थित होते.