( चिपळूण )
श्री भैरी भवानी मंदिराच्या सभा मंडपासाठी १५ लाख रुपये विशेष निधी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासही त्यांनी पुढाकार घेतला. या योगदानाबद्दल सुर्वे परिवारातर्फे आमदार शेखर निकम यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून यापूर्वीही गडावर जाण्यासाठी शिडी उभारणी तसेच प्रचित गडावरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सुर्वे परिवार आणि ग्रामस्थांनी आमदार निकम यांचे यासाठी मनःपूर्वक आभार मानले.
सत्कार प्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम यांनी, “सुर्वे परिवाराने नेहमीच समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. भविष्यातही शृंगारपूरच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे,” असे आश्वासन दिले. तसेच उर्वरित विकासकामांसाठी शंभर टक्के सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शृंगारपूर येथील हा उपक्रम स्थानिकांच्या धार्मिक आणि सामाजिक गरजांची पूर्तता करणारा असून आमदार शेखरजी निकम यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
यावेळी राजेंद्र सुर्वे, अमीत सुर्वे, शृंगारपूर ग्रामस्थ व इतर सर्वांचे सदर कामी सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. सत्कार समारंभास राजेंद्र सुर्वे, चंद्रकांत सुर्वे, विकास सुर्वे, वसंत सुर्वे, दिलीप राजाराम सुर्वे, सुरेंद्र सुर्वे, दिलीप अर्जुनराव सुर्वे, प्रताप सुर्वे, रवींद्र सुर्वे, अशोक सुर्वे, सुरेश सुर्वे, सुधाकर सुर्वे, सौ. सुचित्रा सुर्वे, शैलेश सुर्वे, गौरव सुर्वे, संजय सुर्वे व अमित सुर्वे यांच्यासह आजी-माजी विश्वस्त, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.