(दापोली)
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दापोली–हर्णे मुख्य रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. मंगळवार, १ जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास, दुचाकी आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली.
या अपघातात एकूण तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले, जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त चारचाकी वाहन क्रमांक MH 12 LP 2112 चालवत असलेले प्रज्वल देवधर आणि त्यांचे सहप्रवासी विराज वणे, तसेच दुचाकी चालक क्रमांक MH 12 LQ 6847 सुदर्शन बहिरे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातस्थळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असल्याने रस्ता अरुंद झाला होता. एक बाजू स्कूल बस, तर दुसरी बाजू फूड व्हॅनमुळे या भागात अपघाताची शक्यता नेहमीच वाढलेली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने वाहने हटवण्याचे, रस्त्यावर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आणि दोषींवर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

