(दापोली / सुदेश तांबे)
दापोली तालुक्यातील खरवते गावठाणवाडी येथून 24 एप्रिल रोजी लक्ष्मी सखाराम शिगवण (वय वर्ष 68) या नापता झाल्या आहेत. याबाबत चंद्रकांत सखाराम शिगवण यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
तसेच तालुक्यातील देहण कानसेवाडी येथून भागीरथी जानू चौगुले (वय 74) या 17 नोव्हेंबर 2024 पासून नापता झाल्या आहेत. याबाबत प्रकाश जानू चौगुले यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी दापोली पोलीस ठाणे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.